कोरोनामुळे वैधव्य आलेल्या महिलांना विशेष पॅकेजसाठी पाठपुरावा करणार-खा.सुप्रिया सुळे

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना काळात १०३६ महिला विधवा झालेल्या आहेत. कोरोनामुळे वैधव्य आलेल्या महिलांसाठी केंद्र सरकारने विशेष पॅकेज किंवा योजना जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. यासंदर्भात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी त्यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यात कोरोना काळात नव्याने तरुण महिलांचे वैधव्याचे प्रमाण वाढले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण व या महिलांच्या उन्नतीसाठी राज्य किंवा केंद्र सरकारद्वारे विशेष मोहीम राबवली गेली पाहिजे, या आशयाचे निवेदन सक्षणा सलगर यांनी दिले. यासाठी पाठपुराव्याचे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिले आहे.

त्यात कोरोना काळात नव्याने तरुण महिलांचे वैधव्याचे प्रमाण वाढले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण व या महिलांच्या उन्नतीसाठी राज्य किंवा केंद्र सरकारद्वारे विशेष मोहीम राबवली गेली पाहिजे, या आशयाचे निवेदन सक्षणा सलगर यांनी दिले. यासाठी पाठपुराव्याचे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिले आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्रात २० हजार महिला विधवा होऊन निराधार

कोरोनामुळे महाराष्ट्रातील जवळपास २० हजार महिला विधवा होऊन निराधार झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी दिली आहे. त्यांनी जवळपास दोनशे संघटनांसोबत या महिलांच्या मदतीसाठी प्रयत्न सुरू केलेत. विधवा झालेल्या सुमारे २० हजार महिलांसाठी राज्य सरकारने तातडीने धोरण जाहीर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. याकरिता राज्यातून १४०० मेल पाठवत संबंधितांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पीडित महिलांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या