संतापजनक: कॉपी तपासण्यासाठी मुलींचे कपडे उतरवले

mit crime

पुणे : बारावीच्या परिक्षेदरम्यान कॉपी लपवल्याच्या संशयाने काही विद्यार्थीनींना कपडे उतरवायला लावल्याचा लाजिरवाणा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील एमआयटी स्कूलमधील हा प्रकार आहे.सध्या दहावी बारावीच्या परीक्षा सुरु असून यादरम्यान कॉपी तपासण्यासाठी कपडे काढून झडती घेण्यात आली, असा आरोप दहावीच्या विद्यार्थिनींनी केला आहे. याप्रकरणी दोन महिला सुरक्षा रक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणी स्टेशन येथील गुरुकुल विद्यालय एमआयटी महाविद्यालयात २१, २६ आणि २८ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास बारावीचे पेपर सुरू असताना वर्गाबाहेरील दोन महिला शिपायांनी पीडीत विद्यार्थीनींना कॉपी लपवल्याच्या संशयावरून तपासणीसाठी एका खोलीत नेले. तिथे कॉपी शोधण्यासाठी त्यांना कपडे उतरवण्यास सांगितले. या प्रकरणाची माहिती एका पीडित विद्यार्थीनीने शनिवारी (३ मार्च) तिच्या कुटुंबियांना देताच संतप्त पालकांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत या सर्व प्रकाराची तक्रार केली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संबंधीत महिला शिपायांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाळेचं स्पष्टीकरण

ज्या प्रकाराबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला, तो तीन दिवसांपूर्वीचा प्रकार आहे. पर्यवेक्षकांच्या सांगण्यावरुनच तपासणी करण्यात आली, असं स्पष्टीकरण शाळेने दिलं आहे.Loading…
Loading...