मुलुंडमधील १०० महिला रिक्षाचालक राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबई : मुलुंड परिसरातील १०० महिला रिक्षाचालकांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. परमिटसाठी शासनाने वाढवलेले शुल्क कमी करावे अशी विनंती यावेळी महिलांनी राज ठकरे यांच्याकडे केली.

bagdure

तसेच लर्निंग लायसन्सपासून ते परमिटपर्यंत मनसेच्या वाहतूक सेनेने केलेल्या मदतीसाठी या महिलांनी पक्षाचे आभार मानले. सर्व महिलांचे प्रश्न जाणून घेत लवकरच त्यांच्या मागणीसाठी राज्य सरकारकडे गांभीर्याने पाठपुरावा करु, असे आश्वासन दिले आहे.

You might also like
Comments
Loading...