मोदी सरकारच्या काळात आलं महिलाराज, लोकसभेत वाढला महिलांचा सहभाग

blank

पुणे – लोकसभा निवडणुकीत भाजपने नोंदविलेल्या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजयानंतर केंद्रात सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज, शनिवारी सायंकाळी ५ वाजता संसदेच्या केंद्रीय सभागृहात भाजपच्या तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक होत आहे. या बैठकीत पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. दरम्यान मोदी सरकारच्या काळात लोकसभेत महिलांचा टक्का वाढलेला दिसून येत आहे.

यंदाच्या निवडणुकीत महिला खासदारांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. रेकोर्डब्रेक महिला खासदार निवडून आल्याने यंदा मोदी सरकारच्या काळात महिलाराज आल्याची चर्चा आहे.

१७ वी लोकसभा( २०१९-२०२४ ) – ८२  महिला खासदार
एकूण महिला उमेदवार ७२४
एकूण विजयी महिला उमेदवार ७८
आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा- १४.३८ %

१६ वी लोकसभा(२०१४-२०१९ ) – ६१  महिला खासदार

१५  वी लोकसभा (२००९-२०१४ ) – ५९  महिला खासदार

‘महाराष्ट्राचं महिलाराज संसदेत’

महाराष्ट्रातील ४८  विजयी उमेदवारांमध्ये 8 महिलांचा समावेश.
लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील एकूण ४८  जागांपैंकी भाजपा २३ , शिवसेना १८ , राष्ट्रवादी काँग्रेस ४ , काँग्रेस १ , एआयएम १ आणि अपक्ष १ जागेवर विजय मिळवलाय. या ४८ उमेदवारांमध्ये ८  महिला संसदेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताना दिसतील.

  • सुप्रिया सुळे(राष्ट्रवादी काँग्रेस): बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी भाजपाच्या कांचन कूल यांना पराभूत केले.
  • पूनम महाजन (भाजपा): उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात भाजपाच्या पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव केला.
  • डॉ. प्रीतम मुंडे (भाजपा) : बीड मतदारसंघात डॉ. प्रीतम गोपिनाथ मुंडे यांनी काँग्रेसच्या बजरंग सोनावणे यांना पराभवाची धूळ चारली.
  • डॉ. हिना गावित (भाजपा) : नंदूरबारमधील भाजपच्या उमेदवार डॉ. हिना विजयकुमार गावित यांनी काँग्रेसचे उमेदवार ऍड. के सी पाडवी यांच्यावर 95 हजार मतांनी विजय मिळवला.
  • रक्षा खडसे (भाजपा) : रावेर मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार रक्षा निखिल खडसे यांनी काँग्रेसच्या डॉ. उल्हास पाटील यांचा पराभव केला.
  • नवनीत कौर राणा (अपक्ष) : अमरावतीत अपक्ष उमेदवार नवनीत रवी राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला.
  • भावना गवळी (शिवसेना): यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना पुंडलिकराव गवळी यांनी काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांना पराभूत केले.
  • भारती पवार (भाजपा) : दिंडोरी मतदार संघातून भाजपाच्या डॉ. भारती प्रवीण पवार यांनी काँग्रेसच्या धनराज महाले यांना हरवले.

भाजपानं राज्यात ७ महिलांना उमेदवारी दिली तसेच काँग्रेसनं ३ , राष्ट्रवादीने १ , तर शिवसेनेने एका महिला उमेदवाराला तिकीट दिलं होतं.