हल्लाबोल आंदोलनात महिलांनी सहभागी व्हावे

ncp ahmadnagar

शेवगाव: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर चालू असलेल्या हल्लाबोल आंदोलन आता अहमदनगर जिल्ह्यातही होत असून यानिमित्ताने अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाभर नियोजन बैठका सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येत्या तारखेला आयोजित हल्लाबोल आंदोलनात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी केले आहे.त्या शेवगाव येथे आयोजित महिला पदाधिकार्यांचा बैठकीत बोलत होत्या.

१५ तारखेला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, खा.सुप्रिया सुळे आदींच्या उपस्थितीत हल्लाबोल आंदोलन होणार आहे. या नियोजनासाठी बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या संगीत दुसंगे,मनीषा कोळगे, डॉ.मेघा कांबळे, आशा भोसले, मीराबाई पुंड, शीतल थोरात, द्वारकाबाई बर्डे उपस्थित होत्या. पंचायत समिती सदस्या मनीषा कोळगे यांनी प्रास्तविक केले.