fbpx

MIMच्या ‘त्या’ नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेची हत्या

one sided love crime

टीम महाराष्ट्र देशा :सोलापूरचे एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्या विरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल करणाऱ्या रेश्मा पडनेकुर यांची हत्या झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या. सोलापूरच्या विजयपूर परिसरात त्यांच्या मृतदेह आढळून आला आहे.

सोलापूरचे एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्या विरुद्ध रेश्मा यांनी १७ एप्रिल रोजी विनयभंगाची तक्रार दिली होती. रेश्मा यांनी ज्या दिवशी तक्रार दिली त्या दिवशी पासून रेश्मा बेपत्ता होत्या. दरम्यान विजयपूर जवळील कोलार गावात काल रात्री त्यांचा मृतदेह सापडला.

रेश्मा यांचा मृतदेह सापडल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. रेश्मा यांच्या अशा मृत्यूमुळे एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांच्यावर संशय घेण्यात येत आहे. रेश्मा यांचा मृतेदह पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.