कास्टिंग काऊच प्रकरणातून महिला खासदारही सुटल्या नाहीत- खासदार रेणुका चौधरी

renuka-chowdhury

नवी दिल्ली: काँग्रेस नेत्या आणि राज्यसभेतील खासदार रेणुका चौधरी यांनी कास्टिंग काऊच प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

रेणुका चौधरी म्हणाल्या, “कास्टिंग काऊच केवळ फिल्म इंडस्ट्रीमध्येच होतं असं नाही, तर प्रत्येक ठिकाणी होतं. महिला खासदार यातून सुटलेल्या आहेत असं समजू नये. त्यामुळे आता हा मुद्दा उपस्थित करुन, देशाने एकत्र होणं गरजेचं असून, Me Too अर्था मी सुद्धा पीडित आहे” असं म्हणायला हव.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी सुद्धा कास्टिंग काऊचसंदर्भात वादग्रस्त विधान केल होत. नवीन वाद निर्माण झाला आहे. ‘रेप के बदले फिल्म इंडस्ट्री में रोटी मिलती है’ असं धक्कादायक विधान करत एकप्रकारे खान यांनी कास्टिंग काऊचचं समर्थनच केलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या होत्या सरोज खान ?

“कास्टिंग काऊच म्हणजे काही नवीन बाब नाही. ही गोष्ट तर बाबा आदमच्या काळापासून चालत आली आहे. प्रत्येक मुलीवर कोणी-ना-कोणी हात साफ करण्याचा प्रयत्न करतंच. सरकारी लोकं करतात तर मग तुम्ही फिल्म इंडस्ट्रीच्याच हात धुवून मागे का लागले आहात?. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही मुलीसोबत काही चुकीचे झाले तरी तिला नोकरी मिळते. बलात्कार करुन सोडून दिलं जात नाही. आता मुलीला काय हवंय, हे सर्व काही तिच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला अशा लोकांच्या हाती यायचे नसेल तर येथे येऊ नका. जर तुमच्याकडे कला आहे तर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये स्वतःला विकण्याची आवश्यकता नाही”.