पक्षांत महिला नेत्यांना डावललं जातय, शायना एनसी यांचा भाजप नेतृत्वावर घणाघात

टीम महाराष्ट्र देशा : येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप कडून आयात करण्यात आलेल्या अनेक नेत्यांना उमेदवारी देण्यात आल्याने पक्षातील निष्ठावंत मात्र वंचित राहिले आहेत. त्यामुळे हे वंचित नेते आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर सूड उगवण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांनी देखील काही आरोप करत भाजपला टार्गेट केले आहे. पक्षांत महिला नेत्यांना डावललं जात असल्याचा आरोप शायना एनसी यांनी केला असून पुरुष नेत्यांना महिलांकडून असुरक्षिततेची भावना वाटत असल्याच त्या म्हणाल्या आहेत.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या निष्ठावंतांपैकी एक असणाऱ्या शायना एनसी यांनी हे वक्तव्य केल्याने भाजपच्या बुडाखाली चांगलाच सुरुंग लागण्याची शक्यता आहे. यावेळी शायना एन सी यांनी ‘मै भी चौकीदार’ कॅम्पेंनचा देखील समाचार घेतला आहे. इतर नेत्यांप्रमाणे ‘मै भी चौकीदार’ अस नावा पुढे लावायला मी सांसद नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, महिलांच्या राजकारणातील प्रवेश आणि अस्तित्वाबद्दल शायना यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता महिलांसाठी लढायची वेळ आली आहे. पुढे त्या म्हणाल्या की, मी बंड करणार नसून संघर्ष करणार आहे, तसेच प्रत्येक राजकीय पक्षाने महिलांना तिकीट दिले पाहीजे. भाजप असो वा काँग्रेस,एनसीपी,शिवसेना या सर्वच पक्षांनी महिलांना समान संधी द्यायला हवी, असे त्या म्हणाल्या आहेत.

Loading...