काकडणेत बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील काकडणे येथे शेतात काम करणा-या विजयाबाई भिका वाघ (६०) या शेतात काम करणा-या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने ती जखमी झाली. ही घटना दि. १५ ऑगस्टला दुपारी घडली. यात विजयाबाई वाघ यांच्यासह पाच ते सहा महिला शेतात काम करीत असताना अचानक विजयाबाई यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यावेळी महिलांनी आरडाओरड केल्याने त्याने तेथून पळ काढला. या हल्ल्यात महिलेच्या डाव्या पायावर जखम झाली असून, त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या घटनेनंतर परिसरातील शेत शिवारात विजय पाटील यांच्या शेतात पुन्हा बिबट्याने हल्ला करीत एक शेळी खाली. यामुळे परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.