भरसभेत गुप्तांगाचा किस्सा सांगणाऱ्या भाजप खासदाराला महिलांनी रोखले

SHARAD BANSODE

टीम महाराष्ट्र देशा– भारतीय जनता पक्षाचे खासदार शरद बनसोडे यांनी एका सार्वजनिक व्यासपीठावर स्वतः सहित पक्षाची अब्रू अक्षरशः वेशीवर टांगल्याचा प्रकार पहायला मिळाला. खासदार शरद बनसोडे यांनी सभेचे संकेत सोडून स्वानुभवाचे प्रसंग सांगताना उपस्थित महिला आणि ज्येष्ठांचा विचार न करता अश्लील किस्सा सांगून स्वतःचे हसू करून घेतले.

पानमंगरुळ गावातील डॉ. अशोक हिप्परगी यांच्या एकसष्टीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे देखील उपस्थित होते. या सगळ्यांच्या उपस्थितीत शरद बनसोडे यांनी कानडी भाषेत भाषण केलं.या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे देखील उपस्थित होते.

बनसोडे यांनी ज्या विषयावर भाषण केलं तो विषय सार्वजनिक ठिकाणी लोकप्रतिनिधीने चर्चा करण्यासारखा अजिबात नव्हता. उपस्थितांनी बनसोडे यांच्या भाषणावर आक्षेप घेत त्यांचे भाषण बंद पाडले.या सगळ्यांच्या उपस्थितीत शरद बनसोडे यांनी कानडी भाषेत भाषण केलं.

नेमकं काय म्हणाले शरद बनसोडे ?

….माझा स्वानुभव सांगतो..मी आठवी नववीला असेल. त्यावेळी झाडावरुन पडलो..त्यामुळे माझे गुप्तांग सरकले..मी बोंबलत होतो….माझे वडील मला दवाखान्यात घेऊन गेले… डॉक्टर म्हणाले चड्डी काढ..आता झाली ना पंचाईत.. आठवे नववीला होतो ना…जरा मोठा झालो होतो.. मी माझ्या वडिलाकडे बघितलो…वडील डॉक्टरांकडे बघत, बघून घ्या म्हणत निघून गेले… मी आणि डॉक्टर दोघेच उरलो…मी वर लाईटकडे बघत होतो…डॉक्टरांनी लाईट पण बंद केली…टॉर्च पकडला…व्यवस्थित बघितले…एका बाजूच्या भागाला पकडले, जोरात हिसका मारला…मी बेजार होऊन अर्धा तास पडलो… त्यानंतर तो त्रास कमी झाला…त्यानंतर औषध नाही की काही नाही…