अन धावत्या कॅबमध्येच महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म

पुणे: अनेक वेळा आपण रेल्वे, बस, किवां रिक्षा यामध्ये प्रसुती झाल्याचे वाचले असेल.आता बस, रिक्षाची जागा कॅबने घेतली आहे. पुण्यामध्ये एक वेगळी घटना घडली आहे. एका महिलेने कॅब मध्ये एका गोड मुलाला जन्म दिला आहे.

एका किल्कवर अगदी काही मिनिटात कॅब दारात येते. २ ऑक्टोबर रोजी पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या रमेश विश्वकर्मा यांना देखील एका किल्कवर येणाऱ्या कॅबने एक आगळी वेगळी आठवण आयुष्यभरासाठी दिली आहे.

विश्वकर्मा यांच्या पत्नी गरोदर होत्या. २ ऑक्टोबर रोजी त्यांना अचानक प्रसुतिकळा येऊ लागल्याने, रमेश यांनी तातडीने ओला कॅब मागविली. काही क्षणात कॅब दारात आली. तातडीने रमेश त्यांच्या पत्नीला घेऊन कॅब द्वारे कमला नेहरू हॉस्पिटलकडे रवाना झाले. पण अर्ध्या रस्त्यातच प्रसुती वेदना वाढल्या. या परिस्थितीत कॅब चालक यशवंत गलांडे यांनी व कॅबमध्ये उपस्थित कुटुंबियांनी प्रसंगावधान दाखवत कॅबमध्ये विश्वकर्मा यांची प्रसुती केली. कॅबमध्येच त्यांनी एका गोडस मुलाला जन्म दिला. या परिस्थितीतच प्रसुती झालेल्या महिलेला व बालकाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. येथे उपस्थित डॉक्टरांनी देखील तातडीने पुढील सोपासकर उरकले व संसर्ग होऊ नये यासाठी उपचार सुरु केले. आता बाळ आणि आई दोघे सुखरूप आहेत.