fbpx

लालफितीच्या कारभाराने काम खोळंबले, महिलेचे थेट शोले स्टाईल आंदोलन

women protest in pune

पुणे: लालफितीच्या कारभारामुळे अनेक जन नडले जातात. त्यामुळे शेकडो वेळा शासकीय कार्यालयात चपला झिजवून देखील अधिकाऱ्यांना पाझर मात्र फुटत नाही. त्यामुळेच अनेकवेळा आंदोलन निदर्शने करावी लागतात. आज समाज कल्याण कार्यालयात हेलपाटे मारून देखील काम होत नसल्याने. चंद्रपूरमधील महिलेने थेट शोले स्टाईल आंदोलन केल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे.

सोनूबाई येवले (वय४५, रा़ चंद्रपूर) असे या महिलेचे नाव आहे़. ही महिला गेल्या काही दिवसांपासून समाज कल्याण कार्यालयात हेलपाटे मारत होती. मात्र तरीही काम होत नसल्याने सोनूबाई येवले यांनी वैतागून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर असलेल्या मोबाईल टॉवरवर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महिला एवढे उंच टॉवरवर चढल्याने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एकच गोंधळ उडाला होता.

दरम्यान, अग्निशमन विभागाच्या मदतीने सदरील महिलेले सुखरूप खाली उतरवण्यात यश आले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाची देखील धांदल उडाल्याच पहायला मिळालं.

2 Comments

Click here to post a comment