लता दीदींच्या नावाने लाखोंचा गंडा

एका महिलेने प्रसिद्ध गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावावर अनेकांना लाखोंचा गंडा लावल्याच समोर आल आहे. सदरील महिलेच नाव रेवती खरे असून तिने लतादीदी यांची खोटी सही करून बनावट निमंत्रणपत्रिका तयार केली होती. रेवती या बनावट पत्रिका लोकांना वाटून आर्थिक मदत घेत.

लता मंगेशकर यांना एका महिलेन सर्व प्रकरणाची हकीकत सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. दरम्यान रेवती खरेवर गागदेवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.