fbpx

सोलापूरमध्ये महिलांसाठी सुरू केलेल्या परिवहन बस झाल्या बंद

Solapur Municipal City Bus Transport

सोलापूर: मनपा परिवहन समितीच्या वतीने कष्टकरी महिला शाळकरी मुलींसाठी शहरातल्या काही भागात विशेष बस सुरू केली होती. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून ही सेवा बंद करण्यात आल्याने महिला विद्यार्थिनींचे हाल होत आहेत.

महिलांच्या सुरक्षेचा विचार करून तत्कालीन सभापती मल्लेश बडगू यांनी जुने विडी घरकुल आणि गोदूताई परूळेकर विडी घरकुल आणि हत्तुरे वस्ती या भागात महिलांसाठी ३०, ४१ क्रमाकांच्या विशेष बस सुरू करण्यात आल्या होत्या. या निर्णयाचे महिलांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतरच्या काळात बस चेसी क्रॅक प्रकरण पुढे आले अणि एक एक करत बस कमी होत गेल्या. त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र बस देण्यास टाळाटाळ सुरू झाली. शिवाय हळूहळू सेवा विस्कळीत होऊन बस बंद झाली. सभापतींना माहितीच नाही

विद्यमान सभापती दैदिप्य वडापूरकर यांना याबाबत विचारले असता, त्यांनी महिलांसाठी अशी बससेवा असल्याची कल्पना नाही असे सांगितले. तसेच अशी सेवा पुन्हा सुरु करण्यासाठी शासनाकडून पुण्याच्या धर्तीवर तेजस्विनी बसेस आणू असे म्हंटले आहे.

1 Comment

Click here to post a comment