Ind Vs Pak- महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा पाकिस्तानविरूद्ध सामना

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची आज इंग्लडमधल्या डर्बी इथं पाकिस्तानच्या संघासमवेत लढत होणार आहे. या स्पर्धेत भारतानं यापूर्वीचे दोन्ही सामने जिंकले आहेत.
भारत आणि पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघात बारा वर्षांत केवळ नऊ एकदिवसीय सामने झाले आहेत. त्यात बहुतांश सामन्यात पाकला पराभवच स्विकारावा लागला आहे. मात्र, आताच्या सामन्या पाकिस्तानची जमेची बाजू इतकीच की, पाकिस्तानची कर्णधार साना मिर, बिसमाह मारुफ, नैन आबिदी यांचा अनुभव आणि त्यांची आतापर्यंतची कामगिरी बघता सामना खेचून आणण्याची क्षमता त्यांच्यात आहे.भारतीय संघासाठी जमेची बाब म्हणजे, कर्णधार  मिताली राज, स्मृती मंधाना आणि पुनम राऊत या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत.
दरम्यान. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरू असलेल्या पाच एकदिवसीय क्रिकेट  सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना आज होणार आहे. या मालिकेत भारतानं यापूर्वी दोन सामने जिंकून २-० अशी आघाडी घेतली आहे.