पिंपरीत तरुणीची धारदार शस्त्रानं भोसकून हत्या

पिंपरीजवळ आकुर्डीत राहणाऱ्या एका तरुणीची दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी चाकूनं भोसकून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. काल रात्री ही घटना घडली. अंतरा दास असं या तरुणीचं नाव असून ती एका आयटी कंपनीत नोकरी करत होती.24 वर्षीय अंतरा ही मूळ पश्चिम बंगालची रहिवासी होती.

देहूरोड पोलीस ठाण्याअंतर्गत काल रात्री दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी तिची धारदार शस्त्रानं भोसकून हत्या केली. हत्या करून हल्लेखोरांनी पळ काढला. काही दिवसांपासून काही तरूण अंतराला त्रास देत होते अशी माहिती आहे. पिंपरीजवळच असलेल्या आकुर्डीत राहणाऱ्या अंतराला गेल्या काही दिवसांपासून काही तरुण तिची छेड काढून तिला त्रास देत होते. काल रात्री दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी तिची धारदार शस्त्रानं भोसकून हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर अज्ञात हल्लेखोर पसार झाले आहेत.

केप जेमिनी या कंपनीत काम करणाऱ्या अंतराला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अंतराच्या वडिलांनी देहु रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.