पोलीस ठाण्यासमोर महिलेवर तीक्ष्ण हत्याराने वार

औरंगाबाद : सासरच्या मंडळींकडून विवाहिता व तिच्या आई-वडिलांविरुद्ध सतत खोट्या तक्रारी दाखल केल्या जाऊ लागल्या. याबद्दलची माहिती अधिकाराखाली मागितलेली माहितीची कागदपत्रे घेण्यासाठी विवाहिता आईसोबत सिटीचौक ठाण्याच्या मागे असललेल्या कार्यालयात गेली. तिथेच पोलिस ठाण्याच्या समोरच महिलेवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याची घटना शनिवारी सिटी चौक पोलीस ठाण्यासमोर घडली.

याप्रकरणी सिटीचौक पोलिसांनी दोन्हीकडील मंडळींविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तत्पूर्वी काही गुंडांनी गर्दीचा फायदा घेत दोघी माय-लेकींना धक्काबुक्की केली.

काही वेळाने माहिती अधिकाराची कागदपत्रे घेऊन त्या दोघी तक्रार देण्यासाठी ठाण्यात जाणार, तोच प्रवेशद्वारासमोर विवाहितेच्या सासू-सासऱ्यांनी त्यांना अडविले. तिथे दोघांत शाब्दिक बाचाबाची सुरू असताना सासूने तीक्ष्ण हत्याराने विवाहितेच्या डाव्या हातावर वार केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे

महत्त्वाच्या बातम्या