ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार केल्याने महिलेचा विनयभंग

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक गोष्ट घडली आहे. मुखेड तालुक्यातील हडोळती येथील एका महिलेला तू ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार का केलास म्हणून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने महिलेला शिवीगाळ करत कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, ३ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पीडितचे पती जांब (ता.मुखेड) येथील पेट्रोल पंपावर सुरक्षा गार्ड म्हणून ड्युटीवर गेले होते. मुलगा अभिजित पवार घराबाहेर रोडवर गेला होता. घरी ती एकटीच होते. यावेळी नरसिंग देविदास पवार, अंतेश्वर ज्ञानोबा पवार हे मोटारसायकल वरून घरासमोर आले. घरी एकटीच पाहून वाईट हेतूने घरात घुसून तू ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार का केलीस असे म्हणून शिवीगाळ केली. त्यावेळी त्या दोघांनीही विनयभंग केला.

तिने आरडाओरड करीत असताना तुला खल्लास करतो ओरडू नको आवाज बंद कर म्हणून वाईट शिवीगाळ करू लागले. तेवढ्यात ओरडण्याचा आवाज ऐकून माझा मुलगा अभिजित पवार व माझा भाया बाबुराव पवार पळतच घरी आल्याचे पाहून दोघेजण घरातून निघून जात असताना पोलिसात तक्रार दिली तर तुझ्या कुटुंबाला खतम करतो, अशी धमकी देऊन ते त्यांच्या मोटारसायकलवरून निघून गेले. या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात नरसिंग देविदास पवार, अंतेश्वर ज्ञानोबा पवार या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या