तब्बल २५ वर्षांनंतर जखमी झालेल्या महिलेला मिळणार नुकसान भरपाई

मुंबई : जोगेश्वरी स्थानकातील पूल कोसळून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या महिलेला तब्बल २५ वर्षानंतर नुकसान भरपाई मिळणार आहे. विद्या सामंत असे या महिलेचे नाव आहे. विद्या यांना १३ लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश ग्राहकमंचाने पश्चिम रेल्वेला दिले आहेत. विद्या सामंत व त्यांचे पती विलास सामंत २८ सप्टेंबर १९९२ ला जोगेश्वरीहून घाटकोपरला जात होते. जोगेश्वरी स्थानकातील पुलावरून ते रेल्वेच्या दिशेने जात असताना पुलाचा काही भाग कोसळला. या अपघातात विद्या सामंत गंभीर जखमी झाल्या होत्या. यानंतर त्यांना कूपर या खासगी रूग्णालयात दाखल केले. विद्या यांना उपचाराचाही खर्च देण्याता आला नव्हता. उपचारादरम्यान त्यांना दोन महिने कामावरही जाता आले नाही. त्यामुळे विद्या यांच्या कुटुंबियांनी रेल्वेकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी ग्राहकमंचाने धाव घेतली होती.

Comments
Loading...