चेंबूरमध्ये अंगावर झाड कोसळून महिलेचा मृत्यू

मुंबई: चेंबूरमध्ये झाड अंगावर कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शारदा घोडेस्वार असे मृत महिलेचे नाव आहे. चेंबूरमधील पांजरापोळ येथील त्या रहिवासी होत्या. आज सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली आहे. शारदा आज सकाळी कामावर जात होत्या. डायमंड गार्डन परिसरात त्या बसची वाट बघत होत्या. याचदरम्यान अचानक त्यांच्या अंगावर झाड पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

शारदा यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या आधीही चेंबूरमध्ये अंगावर झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला होता. स्वस्तिक पार्कमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या कांचन नाथ या महिलेचा मृत्यू झाला होता.

You might also like
Comments
Loading...