महिला कॉन्स्टेबलच्या मुलीचा पोलिस उपायुक्तांवर बलात्काराचा आरोप

औरंगाबाद : पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या विरोधात एका २२ वर्षीय मुलीने बलात्काराची तक्रार दिली आहे. यावरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात मंगळवारी मध्यरात्री श्रीरामे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. औरंगाबाद पोलिस उपायुक्तांवर हा आरोप करण्यात आल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलिस कॉन्स्टेबल महिलेच्या २२ वर्षीय मुलीला नोकरीचेआमिष दाखवत उपायुक्त राहुल श्रीरामे (परिमंडळ 2) यांनी घरी बोलावून बलात्कार केला. अशी तक्रार काही दिवसांपूर्वी या मुलीने केली होती. संबंधित महिला पोलिस कॉन्स्टेबल ही पोलिस आयुक्तालयातच कार्यरत आहे.

या प्रकरणी पीडितेने व्हाट्सआप वरून पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून उपायुक्त (परिमंडळ 2) राहुल श्रीरामे यांच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर श्रीरामे रजेवर होते. मुलीच्या तक्रारी वरून काल मध्यरात्री एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास डीसीपी विनायक ढाकणे करत आहेत.

विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या ‘त्या’ नराधम प्राध्यापकाला अटक

संतापजनक: कॉपी तपासण्यासाठी मुलींचे कपडे उतरवले

You might also like
Comments
Loading...