महिलांसाठी फुल बॉडी मसाज देण्यासाठी चक्क युवकांना, पुरुषांना फोन

satara hi profile masage

सातारा  : उच्चभ्रू (हायफाय) सोसायटीच्या मुलांसाठी फुल बॉडी मसाज देण्यासाठी चक्क युवकांना, पुरुषांना फोन करून विचारणा होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, कॉल बॉय संकल्पनेसाठी सातारा टार्गेट झाल्याने खळबळ उडाली आहे. या सेक्स रॅकेटसाठी एका क्लबच्या वतीने युवती फोनवर संपर्क साधत असल्याचे समोर आले आहे.

याबाबतचा तक्रार अर्जच शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. याबाबत पोलिस ठाण्यात गेलेल्या अर्जात नमूद केलेल्या माहितीनुसार, साता-यातील एका युवकाला मोबाईलवरून फोन आला होता. संबंधित युवतीने तिचे नाव व क्लबची माहिती सांगितल्यानंतर हायफाय सोसायटीच्या महिलांसोबत तुमची मिटींग ठेवली जाईल. 3 तासांच्या मिटींगमध्ये महिलांना फुल बॉडी मसाज व शारीरिक संबंध ठेवावे लागतील व या कामासाठी 40 ते 50 हजार रुपये मिळतील. त्या रकमेतील 20 टक्के रक्कम संबंधित क्लबला व उर्वरीत रक्कम तुम्हाला, अशी माहिती त्या युवतीने मोबाईलवरुन दिली.

या फोननंतर संबंधित युवकाने या प्रकाराची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर युवकाला फोन आलेला नाही.अशा पद्धतीचा फोन साता-यात आल्याने याबाबत खळबळ उडाली आहे. मेट्रोपोलेटीयन व परदेशातील ही विकृती साता-यापर्यंत आल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे. अशा क्लबच्या माध्यमातून कॉलेजमधील युवकांना टार्गेट केले जात आहे. देह विक्रीकडे व त्यातून विविध व्यसनाचे बळी केले जात आहे. पैसे कमावण्यासाठी अशा पध्दतीचा गैरवापर होत असल्याचे समोर आल्याने पोलिस कोणती भूमिका घेणार? व याचा कधी पर्दाफाश करणार? याकडे लक्ष लागले आहे.

सेक्स रॅकेट, वेश्या व्यवसाय हे सातार्‍यात आजही लपूनछपून चालत आहे. मोबाईलद्वारे अनेक युवती व महिलांना जाहिरातीच्या नावाखाली फोन केले जातात. अमुक कंपनी, तमुक व्यवसायाच्या नावाखाली फोन झाल्यानंतर अनेक बहाद्दर सुरुवातीला प्रत्यक्ष भेटीऐवजी मोबाईलवरून मुलाखत घेणार असल्याचे सांगतात. चार-पाच वेळा फोनाफोनी झाल्यानंतर घरगुती व वैयक्तिक सर्व माहिती घेतली जाते.त्यानंतर समोरील व्यक्तीकडून थेट पुरुषांना बॉडी मसाज करून देणार का? त्यासाठी 5 हजार रुपये मिळतील, अशी आमिषे दाखवली जात असल्याची धक्कादायक माहिती आहे.

प्रामुख्याने महाविद्यालयीन युवती व ज्या महिला एकट्या राहतात त्यांना यासाठी टार्गेट केले जात आहे. बहुतेकदा युवती व महिलाही पोलिस ठाण्यात तक्रार देण्याऐवजी स्वत: चा मोबाईल क्रमांक बदलतात. सेक्स रॅकेटसाठी अशा पद्धतीने टोळी कार्यरत असून वेळीच त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने हे लोण आता ग्रामीण भागापर्यंत जात असल्याचे चित्र आहे.Loading…
Loading...