चिमुरडीच्या गुप्तांगाला चटके देणाऱ्या महिलेस अटक

crime

पुणे – स्वयपाक करत असताना मसाल्यात पाणी सांडल्यामुळे चार वर्षाच्या चिमुरडीच्या गुप्तांगासह सर्व अंगावर चटके देणा-या महिलेविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . हा सर्व प्रकार काल उघडकीस आला. याप्रकरणी या चिमुरडीच्या शेजारी राहणा-या रजनीश तिवारी या तरुणाने सोनी शेट्टी या महिलेविरुद्ध फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे.सोनीला पोलिसांनी अटक केलीय मात्र ही मुलगी सोनीची नासल्याचं सोनीने संगतीलयं मात्र या मुलीचे आई बाप कोण ? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे कि नाही यावर पोलीस बोलायला तयार नाहीत.

फिर्यादींकडे ही चिमुरडी नेहमी येत असते. दरम्यान, काल ही चिमुरडी नेहमीप्रमाणे आली असता फिर्यादींना तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण दिसले. त्यांनी विचारपूस केली असता हा अत्यंत संतापजनक आणि क्रूर प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिवारी यांनी हडपसर पोलीस ठाणे गाठत संबंधित महिलेविरोधात तक्रार दिली. फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार, केवळ मसाल्यामध्ये पाणी सांडल्याच्या कारणावरून या चिमुरडीला चटके देण्यात आले,पीडित चिमुकलीच्या तोंडावर आणि शरीराच्या इतर भागावर चटके देऊन मारहाण केल्याच्या खुना आहेत.मारहाण करून मुलीचा दात ही पडला असल्याचं मुलगी सांगते मात्र ही मुलगी नेमकी कोणाची आहे असा प्रश्न पोलिसांना पडला . याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून आज संबंधित महिलेला अटक केली.

दरम्यान, पीडित मुलगी ही सोनी शेट्टीची नसुन तिने अवैध धंदयाला मुलीचा वापर करता यावा या उद्देशाने ती या मुलीचा साभाळ करुण छळ करत होती अस पीड़ित मुलीच्या शेजाऱ्यांच म्हणणे आहे . पीडित मुलीला सोनी शेट्टीच्या स्वाधीन न करता, एखाद्या संस्थेला सांभाळ करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.Loading…
Loading...