समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत विकास पोहोचल्याशिवाय सुराज्य निर्माण होणार नाही – मुख्यमंत्री

पुणे : आता सुराज्याची लढाई लढावी लागेल, नव्या पिढीला सुराज्य द्यावे लागेल. समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत विकास पोहोचल्याशिवाय सुराज्य निर्माण होणार नाही, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

पिंपरी – चिंचवड महापालिका आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडगाव येथे क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर शैलजा मोरे, क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह ॲड. सतीश गोरडे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर नितीन काळजे होते.

विठ्ठलाची पूजा करण्यापासून मुख्यमंत्र्यांना मराठा क्रांती मोर्चा अडविणार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जो समाज इतिहास विसरतो, त्याला वर्तमानकाळ असतो, मात्र भविष्यकाळ नसतो. क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या स्मारकातून नव्या पिढीला प्रेरणा मिळणार आहे. संग्रहालयात क्रांतीकारकांची आठवण जागृत ठेवली जाणार आहे. क्रांतीकारकांच्या बलिदानाचे मोल समजले नाही तर स्वातंत्र्य धोक्यात येणार आहे. देशाचा इतिहास जागृत ठेवायला हवा, असे नमूद करुन नवीन पिढीला सुराज्य द्यावे लागेल. समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचल्याशिवाय सुराज्य निर्माण होणार नाही.

प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्रांतीची प्रेरणा देणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या स्मृतीला अभिवादन केले. तसेच तरुणांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटवणाऱ्या चापेकर बंधूंच्या स्मृतीला वंदन केले. आषाढी एकादशीच्या दिवशी आपण पांडुरंगाला स्मरतो. आज महाराष्ट्रातील 12 कोटी जनता विठ्ठल-रखुमाईसारखी असून आपले दर्शन घेण्याचा मला योग आला. हा दिवस माझ्यासाठी भाग्याचा आहे, पांडुरंग आपल्या जीवनात आनंद आणो, असे भावपूर्ण उद्गार काढले.

शासन व संस्थांच्या भागीदारीने महाराष्ट्रात महापरिवर्तन – फडणवीस

वृक्षलागवड बनले आहे मोठे आंदोलन – फडणवीस