fbpx

नगराध्यक्षांची स्वाक्षरी न घेताच लाखो रुपयांची बिले काढली – सुशांत मोरे

सातारा : नगरपालिका अधिनियमातील अकाऊंट कोडचे आणि अधिनियमाचे उल्लंघन करुन नगराध्यक्षाची सही न घेता सातारा नगरपालिका मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी लाखो रुपयांची बिले काढली असल्याचा धक्कादायक आरोप सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी आज पत्रकार परिषदेत पुराव्यानिशी केला आहे. तसेच मुख्याधिका-यांना निलंबित करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्याची ही मागणी त्यांनी यावेळी केली.

सुशांत मोरे पुढे म्हणाले, सातारा विकास आघाडीची सत्ता येवुन एक वर्ष पुर्ण झाले आहे.या वर्ष भरात सातारा पालिकेत कारभाराचा सावळा गोंधळ सुरु आहे. मोठ्या प्रमानात बोगस बिले काढली जात आहेत. मात्र पुराव्या अभावी काहीच करता नाही अशी परिस्थिती होती. मुख्याधिकारी हे प्रशासकीय अधिकाराचा गैरवापर करत संपुर्ण यंत्रणा दबावाखाली आणुन नगराध्यक्षांना अंधारात ठेवून बिले काढली असुन याची माहितच माहीतीचा अधिकारात उघड झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तरी मुख्याधिकारी शंकर गोरे यांना तत्काळ निलंबित करुन त्यांचावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.नगराध्यक्षा कटपुतली आहेत का? सव्वा वर्षा पुर्वी सातारकरांनी नगरपालिकेत सामान्य व्यक्तीला नगराध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली.तरी नगराध्यक्षाचा परस्परच अशी बिले काढत असतील तर नगराध्यक्षा कटपुतलीच झाल्या असल्याचा आरोप सुशांत मोरे यांनी केला