शस्त्रक्रिया न करता मुळव्याधाला करा रामराम

blank

टीम महाराष्ट्र देशा : मुळव्याध हा माणसाच्या गुदभागी होणारा आणि प्रचंड प्रमाणावर त्रास देणारा आजार आहे. या आजाराला अनेक जण त्रासले आहेत. मात्र यावर उपाय शोधला आहे डॉ.संदीप अगरवाल यांनी तोही कसल्याही पद्धतीची शस्त्र क्रिया न करता.

अवघ्या दहा मिनिटात उपचार (बायोलॉजिकल इलेक्ट्रीकल इप्पेडस ऑटो मेजरमेंट) च्या मदतीने यांच्याच शिवाजी नगर येथील अथर्व हॉस्पिटल मध्ये ‘एलजी -२०००’ या अत्याधुनिक मशिनच्या सहाय्याने काही मिनिटातच विना चिरफाड विना रक्तश्राव उपचार सुरु केला आहे.

मूळव्याध यालाच ‘पाईल्स’ किंवा ‘हेमोरहोयडस्’ असेही संबोधले जाते. आज बदलती जीवनशैली आणि आहाराच्या चुकीच्या सवयी यांमुळे मूळव्याधीची समस्या वाढताना दिसत आहे. प्रश्न आहे तो या आजारांविषयी मोकळेपणाने बोलण्याचा आणि समाजात त्याबाबत जनजागृती करण्याचा.

मूळव्याध हा आजार बैठे काम करणा-या लोकांमध्ये विशेष करून आढळतो. मूळव्याध हा गुदद्वाराचा आजार आहे. सामान्यता गुदद्वाराच्या ठिकाणी कुठलंही लक्षण जाणवलं, की मला आता मुळव्याध झाली आहे, अशीचं प्रत्येक रुग्णाची भावना असते. मात्र गुदद्वाराजवळ अनेक आजार होतात. यामध्ये फिशर, भगंदर, मलावष्टंभ (Constipation) आणि मूळव्याध असे अनेक आजार गुदभागाजवळ आणि गुदभागामध्ये होत असतात.

या बद्दल अधिक माहिती देताना डॉ.अगरवाल म्हणाले की,

मुळव्याध भगंदर,फिशर,पायलोनिडल,सायनस अशा आजारांवर ‘बी.ई.आय.एम हे तंत्रज्ञान म्हणजे आधुनिक वैद्यकीय संशोधनाचा अविष्कार आहे.यामुळे वेदना देखील कमी होतात.आणि रुग्ण चालत घरी जाऊ शकतो. त्याचबरोबर ह्या साठी खर्च ही कमी असल्यामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणार आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान म्हणजे मुळव्याध, भगंदर, फिशर आदी आजारांनी त्रस्त झालेल्यांना हे एक प्रकारे वरदानच ठरत आहे.

अधिक माहितीसाठी या नंबरवर संपर्क साधा ०२०-२५५३५७५७

डॉक्टरांनी एकत्र येत दिला ‘रन फॉर हेल्थ’ चा संदेश

जाणून घ्या- गरम पाणी पिण्याचे फायदे

काय आहेत कारल्याचे फायदे?