सेना-भाजप यासंदर्भात आणखी एकदा पंतप्रधानांना आठवण करून देणार – आठवले

टीम महाराष्ट्र देशा : युतीच्या सत्ता सूत्रानुसार ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील, त्यांचा मुख्यमंत्री होईल किंवा अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री असावा, अशी तडजोड होऊ शकेल. यासाठी शिवसेनेने बीजेपी सोबत राहिले पाहिजे. महाराष्ट्रात शिवसेनेला भाजपसोबत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सेना-भाजप यासंदर्भात आणखी एकदा पंतप्रधानांना आठवण करून देणार आहे. तर लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-सेनेने एकत्र यावे. एकटे लढल्यास महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे शक्य नाही. भाजपसोबत विधानसभा निवडणूक लढली तरच सेनेचा मुख्यमंत्री शक्य आहे. अस मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केल आहे.

केंद्रात कॅबिनेट आणि महाराष्ट्रातही एखादे मंत्रीपद देऊन सेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न व्हावा, असाही आपला प्रयत्न राहणार आहे. शिवसेना जर भाजपसोबत राहिली नाही, तर त्यामध्ये सेनेचेच नुकसान होईल. अस देखील रामदास आठवले म्हणाले आहेत. रिपाइंच्या मराठवाडास्तरीय बैठकीस उपस्थित राहण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केल आहे.

You might also like
Comments
Loading...