पाऊस ना पाणी तरीही इंदापूर तालुक्याला पुराचा फटका

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात पूर आला आहे. तर इंदापूर तालुक्याला पाऊस नसताना देखील पुराचा फटका बसला आहे. नीरा आणि उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीला पूर आला आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. भीमा आणि नीरा नदीला पूर आल्याने अर्धे नरसिंहपूर पाण्यात बुडाले आहे. चारही बाजूंनी नरसिंहपूरला पाण्याने वेढले आहे.

सध्या उजनी पात्रात 1 लाख 60 हजार विसर्गाने पाणी जमा होत असून उजनीमधून 1 लाख 70 हजार क्यूसेकचा विर्सग भीमा नदीत करण्यात येत आहे. तर नीरा नदीमध्ये वीर धरणातून 90 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे भीमा आणि नीरा नदीला पूर आला आहे. दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच प्रशासनाने ही जागोजागी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

दरम्यान राज्यात गेले दोन दिवस पावसाने कहर केला आहे. कोल्हापूरमध्ये अतिवृष्टीमुळे आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक लोक पुरात अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्या बचावासाठी गोवा कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर कोल्हापुरात एअरलिफ्टिंगसाठी दाखल झाले आहेत. तसेच एनडीआरएफ आणि नेव्हीचे जवान देखील बचावकार्यासाठी दाखल झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द करून, पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्याला भेट द्यावी’

जाणून घ्या राज्यभरातील पावसाची स्थिती एका क्लिकवर

मुंबई, कोकणात पावसाचा हाहाकार; जनजीवन विस्कळीत