fbpx

“लोकसभेची निवडणूक लढवणार की नाही, याबाबत पुढील दोन दिवसात निर्णय घेऊ”

टीम महाराष्ट्र देशा – लोकसभेची निवडणूक लढवणार की नाही, याबाबत राष्ट्रवादीमधील काही प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करून पुढील दोन दिवसामध्ये निर्णय घेऊ असे शरद पवार यांनी म्हटलं आहे. सांगोला येथील दुष्काळी परिषदेत ते बोलत होते.

लोकसभा निवडणूक काही दिवसंवरती येऊन ठेपली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभेची निवडणुकीच्या लढावी, अशी इच्छा पक्षाच्या नेत्यांनी वर्तविली आहे. त्यावर शरद पवार यांनी पुढील दोन दिवसामध्ये निर्णय घेऊ असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सांगोल्यात दुष्काळी परिषदेत शरद पवार यांनी माढ्यातून २००९ प्रमाणे पुन्हा निवडणूक लढवावी अशी जाहीर मागणीच माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी केली. यानंतर शरद पवार यांनी त्यांची भूमिका मांडली.

२००९च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून पवार यांना ५ लाख ३०  हजार ५९६ मते मिळाली होती, तर त्यांचे विरोधक भाजपाचे सुभाष देशमुख यांना २ लाख १६ हजार १३७ मते मिळाली होती.