दीड वर्षात भाजपचे मुख्यालय तयार, शिवस्मारकासाठी एक वीटही रचली नाही

sanjay nirupam

मुंबई : भाजपचे मुख्यालय अवघ्या दीड वर्षात बांधल्या गेले मात्र शिवस्मारक आणि डॉ. आंबेडकर स्मारकाची घोषणा होऊन दोन वर्षे लोटली, मात्र अद्याप कामही सुरु झाले नाही. असा खोचक सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी उपस्थीत केला आहे.

Loading...

भाजपच्या नवीन मुख्यालयाच काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्थे उद्घाटन करण्यात आलं. भाजपने फक्त दीड वर्षात मुख्यालयाच काम कस पूर्ण केल म्हणून विरोधकांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

संजय निरुपम म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं भूमीपूजन होऊन दोन वर्षे लोटली, अद्याप स्मारकाच्या उभारणीसाठी एक वीटही रचली गेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमीपूजनालाही दोन वर्षे झाली, तिथेही अद्याप काम सुरु झाले नाही. मात्र दिल्लीत अवघ्या दीड वर्षात भाजपच्या अलिशान मुख्यालयाची इमारत उभी राहिली. काल उद्घाटनही झाले. यांचं प्राधान्यक्रम कशाला आहे ते लक्षात येईल.”, अशे बोलू संजय निरुपम यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.Loading…


Loading…

Loading...