येत्या आठ दिवसात पुणे शहर शिवसेनेला मिळणार नवीन शहरप्रमुख

uday samant

पुणे – मागील तीन महिन्यांपासून रखडलेल्या पुणे शहर शिवसेनेच्या शहर प्रमुखांसह इतर नेमणुका येत्या आठ दिवसात जाहीर केल्या जाणार असून शहर प्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सध्या पुण्यात सुरु आहे.पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख उदय सामंत यांनी पुण्यात आज पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची माहिती दिली.
पुणे शहराचे शिवसेनेचे विद्यमान शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी स्वतः शहरप्रमुखपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर नवीन शहरप्रमुख कोण असणार याबद्दल वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. तसेच महिला आघाडीच्या,युवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका देखील मागील कित्येक दिवसांपासून रखडलेल्या अवस्थेत आहेत.आगामी निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने या नेमणुका महत्वाच्या ठरणार आहेत . येत्या आठवडाभरात या सगळ्या नेमणुका केल्या जाणार असून पुणे शहर शिवसेनाप्रमुखपदाची माळ नक्की कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे .चंद्रकांत मोकाटे ,महादेव बाबर या दोघांची नावे शहरप्रमुखपदासाठी चर्चेत असल्याचं बोललं जात आहे.
आदित्य ठाकरे येणार पुणे दौऱ्यावर;पदाधिकाऱ्यांशी साधणार थेट संवाद
२३ आणि २४ नोव्हेंबर ला आदित्य ठाकरे पुणे मावळ,पिंपिरी चिंचवडच्या दौऱ्यावर येणार असून पुणे,लोणावळा,आणि पिंपरीमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत आणि थेट संवाद साधणार आहेत.







Loading…










Loading…

Loading...