fbpx

मराठा तरूणांवर दाखल केलेेले गुन्हे तातडीने मागे घ्या : उद्धव ठाकरे

मुंबई :  मराठा तरूणांवर दाखल केलेेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अन्यथा शिवसेना आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. निरपराध मराठा बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर या तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. मात्र ते पाळलं गेलं नाही, त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना बजावलं आहे.

राज्यात सध्या सर्वत्र अस्वस्थता; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आंदोलनात, अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांची सध्या धरपकड सुरू आहे. त्यामुळे आज मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयक समितीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली. या बैठकीत कोपर्डी निर्भया प्रकरणातील कुटुंबीय ही उपस्थित होते. या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

महाराष्ट्र पेटवणारा कोणीही शिवरायांचा मावळा नाही. काही लोकांना त्रास दिला जातोय. गुन्हे दाखल केले जात आहे. पण गुन्हे मागे घेतले जातील असं सांगितलं होतं पण तसे आदेश कुठल्याही पोलीस स्टेशनला दिले नाहीत. मुख्यमंत्र्यांना हेच सांगतोय तुम्ही दिलेला शब्द पाळा .पोलिसांकडे काही पुरावे असतील तर जरूर अटक करा, पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी ताबडतोब गुन्हे मागे घ्यावे, सणासुदीच्या काळात यांच्यावर कायद्याचे खोटं विघ्न आणत आहे ते दूर करा .

मराठा आरक्षण : मागासवर्गीय आयोग १५ नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करणार

बंदमध्ये सहभागी होऊ नये म्हणून कोणीही फोन केला नाही ; संजय राऊत यांचा खुलासा