राष्ट्रवादीच्या मोर्चाची धास्ती घेत पालकमंत्री पालिकेत

गिरीश बापट

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादीच्या मोर्चानंतर पालकमंत्री बापट पालिकेत; कामकाजाचा घेताहेत आढावा
केंद्र व राज्य सरकार गेल्या तीन वर्षात सर्व स्तरावर अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आकुर्डीतील तहसील कार्यालयावर मोठा मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व माजी उपमुख्यमंत्री व पुर्वाश्रमीचे शहराचे कारभारी अजित पवार यांनी केले. त्यानंतर दुस-या दिवशीच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट पालिकेत आले असून कामकाजाचा आढावा घेत आहेत. राष्ट्रवादीच्या मोर्चाची धास्ती घेऊनच पालकमंत्री बापट पालिकेत येऊन कामकाजाचा आढावा घेत असल्याची, चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पालकमंत्री गिरीश बापट दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक पिंपरी-चिंचवड महापालिकेत दाखल झाले. आयुक्त दालनात अधिकारी आणि पालिकेतील पदाधिका-यांसमवेत बैठक सुरु आहे. कामकाचा आढावा घेत आहेत.केंद्र व राज्य सरकाराच्या कारभारा विरोधात राष्ट्रवादीने मोठा मोर्चा काढला. त्याचे नेतृत्व अजित पवार यांनी केले. अजितदादांनी पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपने शहराची वाट लावल्याचा आरोप देखील केला होता. त्यानंतर दुस-यादिवशी लगेच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट पालिकेत दाखल झाले. आयुक्तांसोबत बैठक घेऊन कामकाचा आढावा घेत आहेत

3 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...