तुटपुंजी मदतीमुळे खर्चही निघणार नाही – आमदार धनंजय मुंडे

धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : राज्यपालांनी ओल्या दुष्काळावर घोषित केलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे. यातून पिकांवर झालेला खर्चसुद्धा निघणार नाही. अस्मानी संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला सुलतानी जाचाने छळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी केला. केंद्र सरकारने यात लक्ष घालण्याची मागणीही त्यांनी केली.

राज्यातील राजकीय स्थिती अस्थिर असल्याने सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. राज्यपालांनी आज ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना मदत घोषित केली आहे. खरीप पिकांसाठी हेक्टरी आठ हजार रुपये, तर बागायती पिकांना हेक्टरी १८ हजार रुपये एवढी मदत घोषित केली आहे.

“परतीच्या पावसाने हाती आलेले खरिपाचे पीक पूर्ण नष्ट झाले आहे. शासनाने पिकांचे सरसकट पंचनामे करणे अपेक्षित होते. शेतकऱ्यांच्या मुलांना केवळ परीक्षा आणि शैक्षणिक शुल्कही माफ होणे गरजेचे होते. त्यामुळे मदत तुटपुंजी असल्याचे” धनंजय मुंडे म्हणाले

अट किंवा निकषविरहित मदत देणे अपेक्षित होते, असेही आमदार मुंडे म्हणाले. शेतकऱ्यांकडील कर्जवसुलीला स्थगिती द्यावी, वीजबील माफ करावे, रब्बीच्या पेरणीसाठीही उचल स्वरूपात शून्य टक्के व्याजदराने द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

महत्वाच्या बातम्या