नितीश कुमारांच्या मदतीचा भाजपला राज्यसभेतही होणार फायदा

nitishkumar , narendra modi

 

वेबटीम : संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी बिहारमध्ये गाठ बांधल्यानंतर आता भाजप बिहारमध्ये सत्तेत आलेच आहे ,मात्र, राज्यसभेतही या युतीचा फायदा  झाला आहे. जेडीयु आणि प्रादेशिक पक्षांच्या मदतीने भाजप राज्यसभेत बहुमताच्या जवळ पोहोचल आहे.

देशाच्या लोकसंख्येपैकी ७० टक्के भागावर आता भाजपची सत्ता आहे. देशातील सर्वच मोठ्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. तर १२ राज्यांमधून २० किंवा त्याहून अधिक खासदार लोकसभेवर जातात त्यापैकी सात राज्यांमध्ये भाजप घटक पक्षासह सत्तेवर आहे.यामुळे आता नितीश कुमारांच्या मदतीने फायदा होणार आहे जदयूचे राज्यसभेत १० खासदार आहे. यामुळे एनडीएचे राज्यसभेतील संख्याबळ ८९ वर पोहोचले आहे.