मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली

धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन केंद्र जाणार

मुंबई : धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाजातील युवकांमध्ये मोठा असंतोष पहायला मिळत आहे. राज्यात मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता धनगर आरक्षणाची मागणी देखील जोर धरू लागली आहे. हा प्रलंबित मुद्दा आता निकाली काढण्याच्या दृष्टीने आता हालचाली पावलं टाकायला राज्य सरकारने सुरुवात केली असल्याचं समोर आलं आहे.

राज्यातील फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले महादेव जानकर हे मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळासह भेटणार आहेत तर मुख्यमंत्री या शिष्टमंडळासह दिल्लीला केंद्र सरकारकडे जाणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

धनगर आरक्षणासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे शिष्टमंडळ आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. मंत्री महादेव जानकर यांच्यासह धनगर समाजातील प्रतिनिधी आणि पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

हे शिष्टमंडळ धनगर आरक्षण लागू करण्यासाठी सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करावा यासाठी मागणी करणार आहे. महिन्याभरात सर्वपक्षीय धनगर आमदारांचं शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

‘भारत बंद’ला हिंसेचे गालबोट,अॅट्रॉसिटीतील बदलांविरोधात भारत बंदची हाक

You might also like
Comments
Loading...