सांगली : पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून पेट्रोल डिझेलच्या किमतीत दिवेसंदिवस वाढ होतच आहे. सर्वच शहरांमध्ये पेट्रोल शंभरी पार गेले आहे. यावरून केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मोदी साहेबांच्या कृपेने पेट्रोल काही दिवसात १२५ रुपये होईल, तर आणखी काही दिवसांनी १५० रुपये देखील होईल, असा खोचक टोला त्यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या –