मागचा दरवाजा उघडा राहिल्यामुळे लग्न घरातून रोख, दागिने लंपास

औरंगाबाद : लग्न घरातून चोराने रोख आणि दागिने लांबविल्याची घटना २७ जुलै रोजी सायंकाळी सात ते रात्री बाराच्या दरम्यान सातारा परिसरात घडली. तान्हाजी भाऊराव गायकवाड (५८) यांच्या घरातील मागचा दरवाजा उघडा राहिल्याचा फायदा घेत चोरट्यांनी डल्ला मारला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या हळदीचा कार्यक्रम सायंकाळी असल्याने घाई गडबडीत गायकवाड कुटुंबिय घराचा पाठीमागील दरवाजा बंद करण्याचे विसरले. त्याचीच संधी साधून चोराने घराच्या आत प्रवेश करत एक तोळ्याचे मंगळसूत्र, अर्धा तोळ्याचे कानातील दागिने आणि रोख वीस हजाराची रोकड लांबवली.

कार्यक्रम झाल्यानंतर घरी परतलेल्या गायकवाड कुटुंबाला हा प्रकार लक्षात आला.त्यानंतर गुरुवारी गायकवाड यांनी सातारा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक शेवाळे करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या