Share

Ambadas Danve | “ठाकरेंच्या बळावर तुम्हाला नेस्तनाभूत केल्याशिवाय राहणार नाही “; दानवेंचा शिंदे गटाला इशारा

मुंबई : मुंबईत शिवतीर्थ मैदानावर उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा साजरा होत आहे. सकाळपासूनच संपूर्ण राज्यभरातून शिवसैनिक यायला सुरुवात झाली होती. आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात देखील गेले आहे. मात्र आज संध्याकाळी कुणाच्या दसरा मेळाव्याला जास्त गर्दी होणार यावरूनच खरी शिवसेना कोणाची या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.

शिवाजी पार्कवर शिवसैनिकांची मोठी गर्दी जमलेली आहे. बीकेसी मैदानावरही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आले आहेत. शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलेत. अंबादास दानवे म्हणाले कि, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना रडवणारं सरकार राज्यात आहे. मुख्यमंत्र्यांच्या आमदारांच्या अंगात सत्तेची मस्ती चढली आहे. मुंबईचा बोरीवलीतील सुर्वे नावाचा आमदार सांगतो की मी तुला जामीन देतो, कुणाचेही हातपाय तोड. संतोष बांगरनं मध्यान्न भोजन अधिकाऱ्याला मारहाण केली. कुणावरही कारवाई झाली नाही, असं ते यावेळी म्हणाले.

त्याबरोबरच उद्धव ठाकरे यांच्या बळावर तुम्हाला नेस्तनाभूत केल्याशिवाय राहणार नाही असा  इशारा अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला दिला आहे. शिवसेनेच्या नादाला लागायचं नाही असही ते यावेळी बोलताना म्हणाले. पुढे ते म्हणाले, गेल्या ७०-८० दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात पावणेचारशेच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, असं देखील ते यावेळी म्हणाले. मी संभाजीनगरात सांगितलं होतं की, भाड्यानं एकही गाडी लावणार नाही आणि भाड्याचा एकही माणूस आणणार नाही. बाकी ठिकाणी ५ हजार बस लावण्यात आल्या. इथे माजी परिवहनमंत्री आहेत, त्यांना राज्यात किती बसेस हे चांगलं माहिती आहे.

तर दुसरीकडे शिवसेना सर्वसामान्यांची आहे याचं मी एक उदाहरण आहे. मी गेल्या दोन महिन्यांत राज्यातल्या १८ जिल्ह्यांत फिरून आलो. रोज अनेक वल्गना केल्या जातात. पण जनतेप्रती सरकारची संवेदनशीलता हरवली आहे, असाही दानवे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : मुंबईत शिवतीर्थ मैदानावर उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा साजरा होत …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now