नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर देशभरातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. विरोधी पक्षांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी पुढे आणले जात होत. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेत चर्चा देखील केली होती.
मात्र राष्ट्रीय स्तरावर अशा घडामोडी सुरू असताना स्वत: शरद पवार यांनी मात्र आपण या पदासाठी स्पर्धेत नसल्याचं स्पष्ट केलं होत. यानंतर पुढे यानंतर ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचे नाव सुचवले होते. मात्र, आता फारुख अब्दुल्ला यांनी ‘माझी जम्मू काश्मीरला जास्त गरज’ असल्याचे सांगत राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.
यानंतर शरद पवार आणि फारुक अब्दुल्ला यांनी नकार दिल्यानंतर अनेकांची नावे चर्चेत आली आहेत. यामध्ये आता पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांचं नाव सध्या राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आहे. तसेच पुढे माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्याही नावाची प्रचंड चर्चा आहे. यशवंत सिन्हा हे भाजपचे मोठे नेते होते. मात्र, ते आता टीएमसीमध्ये आहेत. यानंतर खासदार एनके प्रेमचंद्रन केरळ सरकारमध्येही मंत्री होते. यांचं नाव देखील राष्ट्रपतिपदासाठी चर्चेत आहे.
महत्वाच्या बातम्या