अनुष्काचा ‘नश’ ग्राहकांच्या भेटीस बाजारपेठेत दाखल.

अनुष्का बनली व्यवसायीक.

अनुष्का शर्मा एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनुष्काने वयाच्या प्रत्येक टप्प्यावर  रियअल आयुष्यात मॉडलिंग,निर्माती, अभिनेत्री अशा भूमिका निभावल्या आहेत. आता अनुष्का एका नवीन भूमिकेत समोर आली आहे. नश हा कपड्याचा ब्रॅन्ड अनुष्काने बाजारपेठत आणला आहे.

प्रत्येक स्त्रीला आपण छान दिसावे असे वाटत असते याकरीता त्या वेगवेगळे कपडे वापरत असतात. पण अनेक वेळा त्यांना त्यामध्ये आरामदाई वाटत नाही. पण अनुष्काच्या मते फॅशन ती असते जी आपल्याला वरून छान न वाटता आतून देखील आरामदाई वाटायला हवी. नश अशा प्रकारचे कपडे तयार करणार आहे जे आरामदाई तर असतीलच पण सर्वसामान्य महिलांना ते परवडतील. सर्वसामान्याच्या आवाक्यात बसण्यासाठी आम्ही नश कपड्याच्या किमंती ९९ रुपयापासून ते ३५०० ठेवल्या आहेत.ज्या सर्वसामान्याच्या आवाक्यात असतील. असे अनुष्काने सांगितले आहे. अनुष्काचा नश ग्राहकांच्या किती पसंतीस उतरतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.