Share

Shikhar Dhawan | अर्धशतक करत, शिखर धवनने लिस्ट-ए करियरमध्ये पूर्ण केल्या 12 हजार धावा

टीम महाराष्ट्र देशा: कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) एक दिवसीय सामना खेळत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एक दिवसीय सामन्यामध्ये कर्णधार शिखर धवनने शानदार अर्धशतक झळकावले आहे. यामध्ये त्यांनी 13 चौकार मारत 77 चेंडूमध्ये 72 धावा केल्या. या खेळीनंतर शिखर धवनने लिस्ट-ए करिअरमध्ये त्याच्या 12000 धावा पूर्ण केल्या आहेत.

शिखर धवन (Shikhar Dhawan) ने लिस्ट-ए करियरमध्ये पूर्ण केल्या 12 हजार धावा

लिस्ट-ए मध्ये 12000 धावा करणारा शिखर धवन भारताचा सातवा फलंदाज ठरला आहे. या सामन्याआधी शिखर धवनला 12000 धावा पूर्ण करण्यासाठी 43 धावांची गरज होती. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये कर्णधार शिखर धवन 162 एक दिवसीय सामन्यांमध्ये 17 शतके आणि 30 अर्धशतके करून 6744 धावा केले आहेत. शिखर धवनने 2018 पासून एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्याचबरोबर त्याने 2021 पासून टी-20 सामना खेळला नाही. शिखर धवन फक्त एक दिवसीय सामने खेळत आहे.

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ने लिस्ट-ए मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा केलेले आहेत. त्याने भारतासाठी 551 सामन्यांमध्ये 21,999 धावा केल्या आहेत. त्यानंतर या यादीच्या दुसऱ्या क्रमांकावर सौरभ गांगुलीचे नाव आहे. त्याने 137 सामन्यांमध्ये 15,622 धावा केले आहेत. यानंतर या यादीमध्ये अनुक्रमे राहुल द्रविड (Rahul Dravid), विराट कोहली (Virat Kohli), महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि युवराज सिंग (Yuvraj Singh) यांची नावे आहेत.

2019 मध्ये शिखर धवनने 2 शतके झळकावली होती. यादरम्यान त्याने 30 सामने खेळत 855 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याला एकही शतक करता आले नव्हते. 2020 साली त्याने 12 सामन्यांमध्ये 455 धावा करत 5 अर्धशतके झळकावली होती. तर 2021 मध्ये त्याने 10 सामन्यांच्या 10 डावांमध्ये 387 धावा केल्या आहेत. यामध्ये त्यांनी 3 अर्धशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर 2022 मध्ये त्याने 17 सामन्यांच्या 17 डावांमध्ये 639 धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) एक दिवसीय सामना खेळत …

पुढे वाचा

Cricket Sports

Join WhatsApp

Join Now