आगामी सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत मनसे जाणार का? वाचा काय म्हणाले राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा- काँग्रेस- महाराष्ट्रात भाजपा सेनेचे त्यापेक्षा वाईट हाल होतील असे सांगताना  ठाकरे  यांनी आगामी सार्वत्रिक निवडणुकीत काय भूमिका असेल ते त्याच वेळी जाहीर करू असे सांगून राजकीय भूमिकेविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सस्पेन्स कायम ठेवला. आज नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना भाजप सरकारवर आपल्या खास शैलीत टीकास्त्र सोडलं.

इंटरनेट आणि मोबाईलमध्ये हेरगिरी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा मोदी सरकारला खड्ड्यात घालणारा आहे. सार्वत्रिक निवडणुका जशा जशा जवळ येतील तसं हे सरकार अशा चुका करतील असं मत मनसे अध्यक्ष ठाकरे यांनी व्यक्त केलं.

‘लोकसभा व विधानसभा निवडणूक एकाच वेळी होण्याची शक्यता राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. ‘भाजप एकाचवेळी फावडे आणि कुऱ्हाड स्वत:च्या पायावर मारून घेणार नाही. आधी फावडं मारून घेतील मग कुऱ्हाड, असं राज म्हणाले.

You might also like
Comments
Loading...