प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

मुंबई : भारतीय प्रजासत्ताकाच्या ६९  व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. जगातील सर्वात मोठी असणाऱ्या भारतीय लोकशाहीची अधिक प्रगल्भतेकडे होत असलेली वाटचाल अभिमानास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, गेल्या सात दशकांच्या वाटचालीत देशाने आपले लोकशाही गणराज्य निष्ठेने टिकवितानाच जीवनाच्या सर्व क्षेत्रात ही व्यवस्था प्रतिबिंबीत करण्यात मिळविलेले यश जगातील लोकशाहीप्रधान राष्ट्रांसाठी आदर्शवत आहे. यापुढील काळात आपली लोकशाही गुणात्मकदृष्ट्या अधिक विकसित होत जाणार असून त्यासाठी सुरू असलेल्या परिवर्तन प्रक्रियेत सर्व नागरिकांनी सहभाग द्यावा. या प्रजासत्ताक दिनानिमित्त उज्ज्वल भविष्यासाठी नवा भारत घडविण्याच्या शासनाच्या प्रयत्नात सर्वांनी सक्रीय सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

4 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...