रमजान ईदनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

मुंबई  : राज्यातील मुस्लिम बांधवांना रमजान ईद (ईद-उल-फितर) निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या असून आध्यात्मिक शुद्धी प्राप्त करून देणाऱ्या रमजान महिन्यानंतरचा हा पवित्र सण प्रेम आणि बंधुभावाचा संदेश देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, परमेश्वराची इच्छा, त्याचे प्रेम, त्याचे अभयदान, त्याचा स्नेह (करुणा) व त्याचा दैवी प्रकाश या सर्व गोष्टींचा समावेशक असलेल्या रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर येणारा रमजान ईद हा सण आनंद आणि उत्साहाचा सण आहे. माणसा-माणसांतील प्रेम व्यक्त करणाऱ्या या सणाच्या माध्यमातून समाजातील बंधुभाव वाढीस लागेल. या सणाच्या निमित्ताने वंचित-उपेक्षितांना सहाय्य करून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी होणारा प्रयत्न निश्चितच सामाजिकता जोपासणारा आहे.

You might also like
Comments
Loading...