fbpx

बारामतीची जागा जिंकण्यासाठी शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

टीम महाराष्ट्र देशा : आम्ही बारामतीसह महाराष्ट्रातील 43 जागा जिंकू, असा दावा मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी पुण्यात बोलताना केला. यावर पवारांनी मिश्कील टिप्पणी करत भाजपला शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपने 43 जागांपैकी 48 जागांची का तयारी केली नाही, असाही प्रश्न पवार यांनी केला. लोकशाहीमध्ये कोण काहीही बोलू शकतं, त्यांच्या तोंडाला लगाम घालू शकत नसल्याचंही ते म्हणाले.

बारामती येथील गोविंद बाग येथे शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपचा चांगलाच समाचार घेतला.

दरम्यान , मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील सभेत राववसाहेब दानवे यांनी 2014 पेक्षा एक जागा जास्त म्हणजे 43 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. ही 1 जागा बारामतीची असेल म्हणत, आता बारामती जिंकायचीच असा नारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मागील निवडणुकीत बारामती लोकसभेत कमळ चिन्ह असते तर काय चित्र असते हे सर्वांना माहीत आहे. यावेळी कमळ चिन्ह घेऊनच लढले जाईल. अस स्पष्ट केल आहे.