fbpx

हिवाळी अधिवेशन अधिवेशन दोन आठवडे चालणार

टीम महाराष्ट्र देशा : हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ जाहीर झाला आहे. हिवाळी अधिवेशन दोन आठवडे चालणार आहे. हिवाळी अधिवेशन 19 ते 30 नोव्हेंबर या कार्यकाळात घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गुरुनानक जयंतीच्या दिवशीही कामकाज सुरूच राहणार आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अधिवेशनाचा काळ वाढवण्याची मागणी केली आहे. हिवाळी अधिवेशन काळात मुंबईत आमदार निवास नसल्यास प्रत्येक सदस्याला एक लाख रुपये निवास भत्ता देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, इतक्या कमी पैशांत हॉटेल कसे मिळेल आणि कार्यकर्त्यांची कशी सोय करता येईल, याची चिंता सदस्यांना सतावते आहे.