Share

Winter Session 2022 | विदर्भातील शेतकऱ्याला न्याय मिळेल का? – अमोल मिटकरी

Winter Session 2022 | नागपूर : राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना, या भागातील संत्री पिकावर कोळशी या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. विदर्भात अधिवेशन सुरू असताना या भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला.

विदर्भातील नागपूर आणि अमरावती जिल्हे संत्र्यासाठी प्रसिद्ध आहेत. संबंधित मंत्र्यांनी दिलेले उत्तर हे समाधानकारक मिळालेले नाही, याबद्दल मिटकरी यांनी संत तुकडोजी महाराज यांच्या ओळींचा दाखला देत राज्य सरकारचे कान टोचले.

या भागातील फलोत्पादक शेतकऱ्याला नुकसान भरपाई किती मिळाली, कृषी विभागाने कोणतीही तपासणी केलेली नाही ही तपासणी कधी पर्यंत होईल, या नुकसानीला निकष काय लावले, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना काय करणार, असे प्रश्न उपस्थित करून अमोल मिटकरी यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या संकटाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

महत्वाच्या बातम्या : 

Winter Session 2022 | नागपूर : राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना, या भागातील संत्री पिकावर कोळशी या रोगाचा …

पुढे वाचा

Agriculture Maharashtra Marathi News Nagpur Politics

Join WhatsApp

Join Now