Winter Session 2022 | नागपूर : विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या घोटाळ्याची २८९ अन्वये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार एकनाथ खडसे यांनी सभागृहात पोलखोल केली. भव्य कृषी-क्रीडा-सांस्कृतिक महोत्सवात सरकारी अधिकाऱ्यांना पैसे गोळा करण्याचे टार्गेट दिल्याचा दावा खडसे यांनी केला. यासाठी वृत्तपत्रात आलेल्या बातमीचा दाखला त्यांनी दिला. एकंदरीत १५ कोटी रुपयांची उलाढाल या प्रकरणात होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.
एका बाजूला गायरान जमीन देण्याचा राज्य मंत्र्यांना अधिकार नसतानाही गायरान जमीनीचे वाटप करणे तसेच अधिकाऱ्यांना वेठीस धरून पैसे गोळा करण्याचे प्रयत्न करणे हे नीतीमत्तेत बसते का असा सवाल खडसे यांनी सत्ताधाऱ्यांना केला. अशाप्रकारचा भ्रष्टाचार जबाबदार व्यक्तीकडून होत असेल तर या संपूर्ण घटनेची चौकशी करून हा पैसा नेमका जातो कुठे, त्याचे नियम काय,राज्यात सर्वत्र ही वसुली सुरू असल्याने घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी सभागृहात केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील काल सभागृहात हा मुद्दा मांडला होता.
काय आहे प्रकरण –
अजित पवार म्हणाले, “उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ताशेरे ओढले आहेत. अब्दुल सत्तार महसूल राज्यमंत्री असताना वाशिम जिल्ह्यातील मौजे घोडबाबूळ येथील सरकारी गायरान जमीन गट क्रमांक 44 मधील 37 एक्कर 19 गुंठे जमीनीचा घोटाळा झाला. किंमत काढली तर हा घोटाळा 150 कोटींचा आहे. गायरान जमीनी कुणाला देता येत नाहीत, असा सुप्रिम कोर्टाचा निकाल आहे. त्याचे पालन आपण सर्वांनी केले आहे. तेव्हाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोर्टाचा निकाल आणि राज्य सरकारच्या आदेशाची संपूर्ण माहिती असताना 37 एक्कर गायरान जमीन योगेश खंडागळे या व्यक्तिला वाटप करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कायदेशीर बाबींचे उल्लंघन करणारा होता.”
“तत्कालीन महसूल राज्यमंत्र्यांविरोधात ठोस पुरावे उपलब्ध आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय अवैध असल्याचे वाटले. त्यांनी 5 जुलै 2022 ला महसूलच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिलं. देवेंद्र फडणवीस त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते. शिंदे सरकार सत्तेत आले होते. त्यात वादग्रस्त आदेशाचा अंमल केल्यास कोर्टाचा अनादर होईल, असे कलेक्टरांनी नितीन करीरांना कळवले. या पत्रावर दुर्देवाने शासनाने अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. ही बाब अतिशय गंभीर आहे. यामध्ये राज्यमंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे. याची जबाबदारी स्वीकारून मंत्रिमहोदयांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे,” अशी मागणी अजित पवार यांनी केली.
अजित पवार म्हणाले, “आणखी एक गंभीर प्रकरण आहे. सिल्लोड येथे 1 ते 10 जानेवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय कृषि व क्रीडा महोत्सवासाठीही अब्दुल सत्तार यांनी कृषी विभागाला वेठीस धरून कोट्यवधी रुपयांची वसुली सुरू केली. त्यासाठी दहापेक्षा जास्त तालुके ज्या जिल्ह्यामध्ये आहेत त्यांनी प्लॅटिनिअम म्हणजे 25 हजार रुपयांच्या 30 प्रवेशिका खपवायच्या. डायमंड 15 हजारांच्या 50 प्रवेशिका खपवायच्या. 10 हजारच्या 75 प्रवेशिका खपवायच्या. साडेसात हजारांच्या सिल्वर 150 प्रवेशिका खपवायचे टार्गेट दिले आहे. हा भ्रष्टाचार नाही आहे का?. त्यामुळे संबंधित मंत्र्यांचा राजीनामा सरकारने केला.”
महत्वाच्या बातम्या :
- IPL 2023 | ख्रिस गेलने लाईव्ह कार्यक्रमात केला अनिल कुंबळेवर गंभीर आरोप, म्हणाला…
- Winter Session 2022 | सीमाप्रश्नावर कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर
- Sanjay Raut | देवेंद्र फडणवीसांनी राजकारणातली नैतिक पातळी राखली पाहिजे – संजय राऊत
- Abdul Sattar | अब्दुल सत्तारांच्या मुलीची TET प्रमाणपत्राविना कायम नेमणूक, धक्कादायक माहिती समोर
- Urfi Javed | उर्फी जावेदचा बेभान अंदाज, नाश्त्याच्या प्लेटने झाकले शरीर