Winter Session 2022 | नागपूर : विदर्भातील सतत पडणाऱ्या पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाने पहिल्यांदाच ७५० कोटी रुपयांची मदत दिल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. विदर्भातील अतिवृष्टीबाधित संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत सदस्य अमोल मिटकरी यांनी सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्याला उत्तर देताना मंत्री उदय सामंत बोलत होते.
सामंत म्हणाले की, अमरावती विभागात संत्री फळ पिकाचे कोळशी या रोगामुळे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले नाही. नागपूर जिल्ह्यात संत्री पिकावर २ हजार ८८२ हेक्टर आणि मोसंबी पिकावर २७० हेक्टर क्षेत्र अशा एकूण ३ हजार १५२ हेक्टर क्षेत्रावर कोळशी रोग्याचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. हा प्रादुर्भाव नुकसान पातळीच्या खाली आहे. हॉर्टसॅप योजनेंतर्गत कीड सर्वेक्षण व कीड नियंत्रक यांच्यामार्फत सर्वेक्षण व जनजागृती केली. या सर्वेक्षणामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील किंवा सर्वेक्षणापासून वंचित राहिलेल्या ठिकाणी पुन्हा सर्वेक्षण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या जातील. विदर्भातील शेती आणि फळपीकांच्या बाधितक्षेत्रासाठी ३ हजार १०३ कोटी रूपयांची नुकसान भरपाई राज्य शासनाकडून वितरित करण्यात आली.
विदर्भातील अमरावती व नागपूर विभागातील संत्रा व मोसंबी उत्पादकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहीमेला गती देण्यात येईल. फळपिकांवरील औषध फवारणीबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचार- प्रसार करण्याबाबत संबंधित विभागाला सूचना दिल्या जातील, असे मंत्री सामंत यांनी उत्तरात सांगितले.
पीक विम्याबाबत उप प्रश्नाला उत्तर देतांना सामंत म्हणाले, अमरावतीमध्ये एकूण शेतकऱ्यांची संख्या ९ हजार २७६ असून क्षेत्र ९ हजार २५७ हेक्टर आहे. देय रक्कम ही १८६१. ३४ लाख रुपये आहे. त्यापैकी ४ हजार ६९७ शेतकऱ्यांना १८५१.३१ कोटी रुपये पीक विम्याचा लाभ मिळाला.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | हे सर्व मुख्यमंत्री पदासाठी केले नाही – एकनाथ शिंदे
- Hair Care Tips | कोकोनट मिल्कचे ‘हे’ हेअर मास्क वापरून केस ठेवा निरोगी
- Jayant Patil | जयंत पाटील अधिवेशन संपेपर्यंत निलंबित! मुंबई, नागपूर विधिमंडळ परिसरात येण्यास बंदी
- Jayant Patil | जयंत पाटील थेट अध्यक्षांवर संतापले, अपशब्दाचा वापर ; सत्ताधाऱ्यांकडून निलंबित करण्याची मागणी
- Health Care | चंदनाच्या तेलाने शरीरातील ‘या’ समस्या होऊ शकतात दूर